अमळनेर । अमळनेर शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. मुलीला फोन करून रात्री भेटण्यास बोलावून दुचाकीवर बसवून तिच्यावर चोपडा रोडवरील मोकळ्या जागेत नेऊन अत्याचार केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आलीआहे.
पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील एका भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवार १२ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता संशयित आरोपी अन्नू नारायण साळुंखे (पारधी) रा. अमळनेर याने पीडित मुलीला फोन करून भेटण्यास बोलविले. त्यानंतर त्याने तिला दुचाकीवर बसवून चोपडा रोडवरील एका मंदिराच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन तिच्यावर जबरी अत्याचार केला. या घटनेसाठी संशयित आरोपीला गण्या उर्फ गणेश नाना साळुंखे (पारधी) याने सहकार्य केले.
दरम्यान हा प्रकार घरी आल्यानंतर पिढीने नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार नातेवाईकांसह तिने अमळनेर पोलिसात धाव घेऊन दोघांनी विरोधात फिर्याद दिली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून बुधवारी १३ ऑगस्ट रोजी रात्री आठ वाजता संशयित आरोपी अन्नू नारायण साळुंखे (पारधी) आणि गण्या उर्फ नाना साळुंखे (पारधी) दोन्ही राहणार अमळनेर या दोघांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढीलचा पास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहे.















Discussion about this post