भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) मध्ये तरुणांसाठी चांगल्या कंपनीत नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. BHEL कडून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. तब्बल ५१५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, मेकॅनिस्ट, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक आणि फाउंड्री मॅन या पदांचा समावेश आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु असून इच्छुक उमेदवारांनी bhel.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे.
पात्रता
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे आहे. याचसोबत संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कमीत कमी ६० गुण प्राप्त केले असावे.
| जाहिरात (PDF) | Click Here |
| Online अर्ज | Apply Online |
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २७ वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
सरकारी कंपनीत नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुमचं करिअर अजूनच चांगलं होईल. तुम्हाला अनेक गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधी अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर Apprentice Recruitment 2025 वर क्लिक करायचे आहे. यानंतर नवीन रजिस्ट्रेशन करावे.यानंतर तुमची सर्व माहिती भरा. कागदपत्रे अपलोड करा आणि हा फॉर्म सबमिट करा. या फॉर्मची प्रिंट आउट तुमच्याजवळ ठेवा.















Discussion about this post