जळगाव | धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनेसाठी १० ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी तथा उच्चस्तरीय निवड समिती,सदस्य सचिव प्रतापराव पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
२०२३-२४ साठी अनुदान प्राप्त करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील इच्छूक शैक्षणिक संस्थांनी अल्पसंख्यांक विकास विभागाचा ७ अॉक्टोंबर २०२३ च्या तरतूदीनुसार विहित नमुन्यात अर्ज जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे मुदतीत सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेले प्रस्ताव विचारात घेतले जाणार नाही. अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांची यादी www.maharastra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे ही श्री. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
Discussion about this post