जळगाव – गीत झंकार संस्थेतर्फे “आम्ही सुर सम्राज्ञी” हा महिलांसाठी व महिलांकडून सादर होणारा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम १३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ला. ना. शाळेच्या गंधे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. शहरातील गुणी महिला, मुली व विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून गायक, वादक व निवेदक या सर्वच भूमिका महिलांकडून साकारल्या जाणार आहेत.
कार्यक्रमात संगीत साथसंगत रागेश्री धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिया वझे, प्रेषिता मोरे, निमिषा सोनवणे, कार्तिकी अहिरे, राजेश्वरी रत्नपारखी आदी कलाकार करणार आहेत. गायिकांमध्ये प्राजक्ता केदार, संगीता सामुद्रे, रजनी भारसके, विद्या भंगाळे, मीनाक्षी सुलक्षणे, शितल बाविस्कर, चंदना काळे, श्रद्धा जोशी, रामायणी चौधरी, निकिता जोशी, देवयानी रसाळ व चेतना सोनवणे सहभागी होतील. निवेदनाची जबाबदारी डॉ. उषा शर्मा व खुशी परदेशी सांभाळतील.
कार्यक्रमाची संकल्पना विजयकुमार कोसोदे यांची असून दिग्दर्शन मोहन तायडे यांचे आहे. त्यांना विकास जयस्वाल व प्रा. यशवंत सैंदाणे सहकार्य करीत आहेत. सर्वांसाठी खुला असलेला हा कार्यक्रम वेळेवर सुरू होणार असून काही आसने मान्यवरांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन संस्थेच्या सचिव कांचन कुमार तायडे यांनी केले आहे.
Discussion about this post