मुंबई | राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु असून याच दरम्यान, केळी महामंडळाची स्थापना लवकरच करण्यात येणार असल्याची घोषणा आज राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री ना. संदीपान भुमरे यांनी विधानपरिषदेत केली.
अलीकडच्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव दौर्यावर असता त्यांनी केळी विकास महामंडळाला १०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र यानंतर राज्य शासनातर्फे या संदर्भात अद्याप देखील अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती.
दरम्यान, या अनुषंगाने आज विधानपरिषदेत केळी विषयावर चर्चा झाली. यात केळी विकास महामंडळाबाबत रणजीतसिंह मोहिते पाटील आणि आ. एकनाथराव खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावर राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री ना. संदीपान भुमरे यांनी केळी विकास महामंडळ लवकरात लवकर अस्तित्वात येणार असून आपली या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्याचे ना. भुमरे म्हणाले. यामुळे आता लवकरच केळी विकास महामंडळ अस्तित्वात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Discussion about this post