सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया ६ ऑगस्टपासून सुरु झाली आहे.या नोकरीसाठी तुम्हाला bankofbaroda.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२५ आहे.
कोणती पदे भरली जाणार?
बँक ऑफ बडोदामध्ये ४१७ पदांसाठी भरती केली जाणार आहे. सेल्स मॅनेजरसाठी २२७ पदे रिक्त आहे. अॅग्रीकल्चर मार्केटिंग ऑफिसर पदासाठी १४२ आणि अॅग्रीकल्चर मार्केटिंग मॅनेजर ४८ जागा रिक्त आहेत. विविध विभागात ही भरती होणार आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या क्षेत्राचे ज्ञान आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करु शकतात.
जाहिरात (PDF) |
Click Here |
Online अर्ज |
Apply Online |
आवश्यक पात्रता (Eligibility)
मॅनेजर सेल्स पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. २४ ते ३४ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. याचसोबत इतर पदांसाठी कृषीय, पशुपालन, पशु चिकित्सा विज्ञान, डेअरी यासंबंधित विषयात पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी वयोमर्यादा २४ ते ४२ निश्चित करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही अधिसूचना वाचा.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला bankofbaroda.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर भरतीसंबंधित लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडा.
यानंतर सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.
Discussion about this post