Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उत्तरकाशीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी गिरीश महाजन तातडीने उत्तराखंडला रवाना; बचावकार्य सुरू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 7, 2025
in महाराष्ट्र
0
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
बातमी शेअर करा..!

मुंबई | उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धाराली परिसरात झालेल्या भीषण भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे महाराष्ट्रातील विविध भागांतील १५१ पर्यटक अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे तातडीने उत्तराखंडकडे रवाना झाले असून, आज सायंकाळी साडेचार वाजता ते देहरादून येथे दाखल होत आहेत.

राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष (SEOC), महाराष्ट्र यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, अडकलेल्या १५१ पैकी १२० पर्यटकांशी संपर्क झालेला असून ते सुरक्षित स्थळी आहेत. उर्वरित ३१ पर्यटकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष, महाराष्ट्र हे उत्तराखंड राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हा नियंत्रण कक्ष (DEOC उत्तरकाशी) तसेच राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद केंद्र (NERC), नवी दिल्ली यांच्याशी सतत समन्वय साधून आहे.

महाराष्ट्राचे मुख्य सचिव,यांनी आज अपर मुख्य सचिव (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग) यांच्यासमवेत मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्र येथे परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी आनंद बर्धन, मुख्य सचिव, उत्तराखंड यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून महाराष्ट्रातील अडकलेल्या नागरिकांना आवश्यक ती तातडीची मदत करण्याबाबत विनंती केली.संचालक (आपत्ती व्यवस्थापन), उत्तराखंड यांच्याकडून महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार बचाव कार्यासाठी खालील उपाययोजना करण्यात येत आहेत

धाराली परिसरातील सर्व पर्यटकांना हेलिकॉप्टरद्वारे हर्षल हेलीपॅड येथून गंगोत्री येथे स्थलांतरित केले जाणार आहे.
गंगोत्री ते धराली मार्गावर बस/अवजड वाहनांची व्यवस्था आणि धराली ते हर्षील दरम्यान पायी प्रवासाचे नियोजन आहे.
गंगोत्री ते हर्षील दरम्यान यात्रेकरुंच्या सुरक्षिततेसाठी १० आयटीबीपी (ITBP) पथकांची तैनाती करण्यात आली असून प्रत्येक पथक ३० पर्यटकांना संरक्षण देणार आहे.
लष्कर, NDRF, SDRF आणि स्थानिक बचाव पथके सध्या धराली परिसरात कार्यरत आहेत. संपर्क यंत्रणा आणि रस्ते अद्याप पूर्ववत झाले नसून, त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
NERC च्या माहितीनुसार हवाई बचाव कार्य सुरू झाले असून लष्कराच्या छोट्या सॉर्टींमार्फत स्थलांतर सुरू आहे. बचाव कार्यासाठी उत्तराखंडमध्ये उपग्रह फोन (Satellite Phone) तैनात करण्यात आले असून श्री. राजीव स्वरूप, IGP हे जबाबदार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

पर्यटकांचे शेवटचे स्थान समजण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांना सूचित करण्यात आले असून त्यांच्या मदतीने शोधकार्य सुलभ होईल.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र हे आवश्यक समन्वय साधून बचाव, मदत आणि कुटुंबीयांना माहिती पुरविण्याचे कार्य सातत्याने करीत आहे.
संपर्क यंत्रणा:

१. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र, महाराष्ट्र
संपर्क: ९३२१५ ८७१४३ / ०२२-२२०२७९९० / ०२२-२२७९४२२९

२. डॉ. भालचंद्र चव्हाण,
संचालक, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, महाराष्ट्र
मोबाईल: ९४०४६९५३५६

३. उत्तराखंड राज्य आपत्कालीन कार्य केंद्र
संपर्क: ०१३५-२७१०३३४ / ८२१८८६७००५

४. श्री. प्रशांत आर्य,
जिल्हाधिकारी, उत्तरकाशी
मोबाईल: ९४१२०७७५०० / ८४७७९५३५००

५. मेहेरबान सिंग,
समन्वय अधिकारी
मोबाईल: ९४१२९२५६६६

६. श्रीमती मुक्ता मिश्रा,
सहायक जिल्हाधिकारी, उत्तरकाशी
मोबाईल: ७५७९४७४७४०

७. जय पनवार,
आपत्ती व्यवस्थापन कक्ष, उत्तराखंड
मोबाईल: ९४५६३२६६४१

८. सचिन कुरवे,
समन्वय अधिकारी
मोबाईल: ८४४५६३२३१९

बातमी शेअर करा..!
Previous Post

नागपूर-पुणे वंदे भारतचे वेळापत्रक आले ; या स्थानकांवर असेल थांबा?

Next Post

महाराष्ट्रापासून कर्नाटकात मतांची चोरी कशी झाली? राहुल गांधींनी पुरावेच सादर केले, निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
महाराष्ट्रापासून कर्नाटकात मतांची चोरी कशी झाली? राहुल गांधींनी पुरावेच सादर केले, निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप

महाराष्ट्रापासून कर्नाटकात मतांची चोरी कशी झाली? राहुल गांधींनी पुरावेच सादर केले, निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page