Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगावच्या भाविकांना परत आणण्यासाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत पाठपुरावा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 7, 2025
in जळगाव जिल्हा
0
उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगावच्या भाविकांना परत आणण्यासाठी पालकमंत्र्यांचा दिल्लीत पाठपुरावा
बातमी शेअर करा..!

जळगाव | उतराखंडमधील अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांना सुखरूप दिल्लीमार्गे जळगावला परत आणण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेऊन तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

या बैठकीस स्मिता शेलार, आशुतोष दिवेदी (सहाय्यक निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन) तसेच प्रमोद कोलपते (व्यवस्थापक, महाराष्ट्र सदन) हे उपस्थित होते. बैठकीत भाविकांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे खासगी सचिव हिमांशू यांच्याशी थेट संवाद साधून भाविकांना शक्य तितक्या लवकर दिल्लीपर्यंत आणण्याची विनंती केली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत हिमांशू यांनी भाविकांच्या सुरक्षिततेबाबत पूर्ण सहकार्य आणि लवकरात लवकर दिल्लीमार्गे सुटकेची व्यवस्था केली जाईल, असे आश्वस्त केले. यावेळी उतराखंडचे पोलीस उपमहानिरीक्षक निलेश भरणे यांच्याशी पालकमंत्री यांचे बोलणे झाले.

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कालपासून दिल्लीमध्येच तळ ठोकून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी नियमित संपर्क ठेवून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग, रेल्वे प्रशासन व इतर यंत्रणांशी समन्वय सुरु केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. धरणगाव) येथील १३ तरुण आणि जळगाव येथील एका कुटुंबातील ३ व्यक्ती सध्या उतराखंडमधील हर्षिलजवळील भगिरथी होमस्टे, बागोरी येथे अडकले आहेत.

अडकलेल्या भाविकांची नावे पुढीलप्रमाणे:

रोहन दिनेश माळी,रोहील बंडू माळी,मनोज संजय चौधरी,ज्ञानेश्वर संजय माळी,दिपक रत्नाकर सोनार, सुखदेव नन्नवरे, दिपक माळी,वैभव गंगवणे, संदीप माळी, विशाल पाटील,रिवेश माळी, भुषण माळी,पवन माळी तर जळगाव शहरातील अनामिका मेहरा, त्यांची कन्या आरोही मेहरा आणि पती रुपेश मेहरा हे सर्व भाविक सुरक्षित असून या सर्व भाविकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यांच्या सुटकेसाठी उत्तराखंड प्रशासन व दिल्लीतील महाराष्ट्र सदनमार्फत तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

उतराखंडमध्ये अडकलेल्या भाविकांच्या जळगावमधील नातेवाईकांना धीर देताना, पालकमंत्री पाटील म्हणाले की, “सरकार आपल्यासोबत आहे. सर्व यंत्रणा कार्यरत असून भाविकांना सुखरूप परत आणले जाईल.”

बातमी शेअर करा..!
Previous Post

ट्रम्पचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर आता ५०% कर भरावा लागणार

Next Post

एसटी महामंडळात १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! आजच करा अर्ज

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एसटी महामंडळात १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! आजच करा अर्ज

एसटी महामंडळात १०वी पास तरुणांसाठी खुशखबर! आजच करा अर्ज

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

तुती लागवड व रेशीम उत्पादन वाढीसाठी जनजागृती रथाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन

March 5, 2026
जळगाव पोलिसांची वाळू माफियांवर भल्या पहाटे मोठी कारवाई; ४० वाहने जप्त

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या 34 वाहनांचा 12 मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page