जळगाव । जळगावच्या रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी एक बातमी आहे. जळगावमार्गे धावणाऱ्या दोन महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना पश्चिम रेल्वेने मुदतवाढ दिली आहे. उधना-खुर्दा रोड साप्ताहिक एक्स्प्रेस आता सप्टेंबरपर्यंत धावणार आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय टळणार आहे.
०९०५९ उधना-खुर्दा रोड साप्ताहिक एक्स्प्रेस दर बुधवारी दुपारी १२.२० वाजता उधना येथून सुटेल व सायंकाळी ५.४० वाजता जळगावात थांबेल. ०९०६० खुर्दा रोड-उघना साप्ताहिक रेल्वे दर शुक्रवारी पहाटे २ वाजता खुर्दा येथून सुटेल व शनिवारी सकाळी ६.५० वाजता जळगावात येईल.
त्यानंतर ती उधनासाठी रवाना होईल. तर २०१५१/५२ रेवा-पुणे-रेवा साप्ताहिक सुपरफास्ट रेल्वेला जळगाव स्थानकावर थांबा दिला आहे. आता ही गाडी पुणेऐवजी हडपसरपर्यंतच धावेल. त्यामुळे रेवा ते हडपसर असा नवीन मार्ग सुरू झाल्याचे रेल्वे विभागाने पत्रक जारी केले आहे.
Discussion about this post