सरकारी बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.यासाठी पात्र उमेदवारांकडून ओनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. www.bankofbaroda.in ही अधिकृत वेबसाइट आहे.
ही भरती असिस्टंट मॅनेजर, डेप्यूटी मॅनेजर, सायबर सिक्युरिटी पदांसाठी जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तरीख १९ ऑगस्ट २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
आवश्यक पात्रता
बँक ऑफ बडोदामधील या नोकरीसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. बीई, बीटेक, एमई, एमटेक किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये एमएससी पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी विविध पदांसाठी पात्रता वेगवेगळी असते. त्यामुळे इच्छुकांनी आधी अधिसूचना वाचा त्यानंतरच अर्ज करावेत.
या नोकरीसाठी वयोमर्यादा ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. या नोकरीसाठी २२ ते ३१ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. तसेच पदानुसार ३१ ते ४८ वयोगटातीलदेखील उमेदवार अर्ज करु शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला शुल्क भरायचे आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना ८५० रुपये शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरायचे आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे होणार आहे.
Discussion about this post