पुणे । पुण्यातील रेव्ह पार्टीत सात जणांना अटक झाली असून यात एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश असल्याने राजकीय वातावरण पेटलं आहे. दरम्यान खेवलकर हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जामिनासाठी अर्ज करण्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वीच रोहिणी खडसे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतलीये.
शरद पवारांच्या भेटीनंतर रोहिणी खडसे यांनी माध्यमांसोबत संवाद साधलाय. रोहिणी खडले यांनी म्हटले की, या सर्व प्रकरणात मी योग्यवेळी उत्तर देणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मी माझ्या पतीला भेटण्यासाठी सीपी कार्यालयात गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते. मला कोर्टात दुसऱ्या दिवशी हजर व्हायचे होते आणि मला त्यांच्याकडून काही माहिती हवी असल्याने मी गेले होते. त्यावेळीच कार्यालयात सीपी साहेब असल्याने मी त्यांची देखील भेट घेतली.
रूपाली चाकणकरांच्या टिकेवर बोलताना रोहिणी खडसे यांनी म्हटले की, करू द्या मग काय झालं…मी योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार आहे. पोलिसांनी सांगितले की, पाळत ठेवणे हा आमचा हेतू नव्हता. त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन हे सांगितलं. तुम्ही मला त्या केस संदर्भात न्यायालयात जी चर्चा झाली ते मला विचारू नका. विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जातं, असं म्हणायला जागा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Discussion about this post