बँकेत सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) ने मोठ्या प्रमाणात भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. लिपिक पदासाठी ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहे.
या भरती द्वारे, तब्बल १०,२७७ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यापैकी सर्वाधिक पदे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरातमधील आहेत. इच्छुक उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट www.ibps.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरू झाली आहे.
पात्रता काय असावी?
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे.
आयबीपीएस लिपिक भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना देशातील विविध सरकारी बँकांमध्ये लिपिक पदावर नियुक्त केले जाईल. ही भरती तरुणांसाठी बँकिंग क्षेत्रात करिअर घडवण्याची सुवर्णसंधी आहे.आयबीपीएस लिपिक परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाईल – प्रिलिम्स आणि मेन्स. आयबीपीएस लिपिक भरतीसाठी २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज करता येतील.
पगार- २४०५०-६४४८० रुपये. यासोबतच इतर भत्ते देखील दिले जातील.
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
Discussion about this post