जळगाव । गृह विभागाने राज्यातील पोलीस दलात कार्यरत ६५ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात जळगाव शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप गावित यांची भुसावळ उपविभागात बदली करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात दोन उपअधिक्षक नव्याने रुजु होणार आहेत.
प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये राज्य पोलीस सेवेतील (रा.पो.से.) एकूण ६५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जळगाव शहरातून संदीप गावित यांची भुसावळ येथे बदली झाली असताना, जिल्ह्याला बाहेरून दोन नवीन उपअधीक्षक मिळाले आहेत.
विजयकुमार ठाकूरवाड यांची चाळीसगाव उपविभागाचे पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बापू रोहोम हे मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत.
या बदल्यांमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात काही प्रमाणात फेरबदल होणार असून, नवीन अधिकारी आपापल्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. गृह विभागाच्या या निर्णयामुळे प्रशासकीय कामकाजात अधिक गती येईल, असे मानले जात आहे.
Discussion about this post