नवी दिल्ली । खरंतर प्रत्येक महिलेच्या पहिल्याच दिवशी अनेक बदल होताना दिसून येतात. त्याच प्रमाणे आजपासून ऑगस्ट महिना सुरु झाला असून आणि या महिन्यात पैशांसंबंधित अनेक नियमांमध्ये बदल झाले आहेत. यामध्ये यूपीआयपासून ते स्टेट बँकेच्या क्रेडिट कार्डपर्यंत अनेक नियम बदलले आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होणार आहे. काही बदल आजपासून झाले आहेत. तर काही बदल येत्या काही दिवसात होणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची ६ ऑगस्ट रोजी पतधोरण बैठक होणार आहे. यामध्ये रेपो रेटबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यामध्ये रेपो रेट स्थिर राहण्याची शक्यता आहे. तर आणखी २५ बेसिस पॉइंट्सने कपा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
UPI च्या नियमांत बदल
आजपासून यूपीआयच्या नियमांत महत्त्वाचे बदल झाले आहेत. आता युजर्संना फक्त ५० वेळा बॅलेंस चेक करता येणार आहे. याचसोबत ऑटोपेच्या नियमांत बदल झाले आहेत.
रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेटमध्ये कपात होण्याची शक्यता
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नवीन रेपो रेट जाहीर करणार आहे. हा रेपो रेट कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत ६ ऑगस्ट रोजी रिझर्व्ह बँकेची बैठक होणार आहे.
आयटीआरची पडताळणी ३० दिवसांत होणार
आयटीआर फाइल केल्यानंतर ३० दिवसांच्या आत पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतर आयकर विभाग तुमचा आयटीआर पडताळणीसाठी घेऊन. तुम्ही ऑनलाइन आयटीआर फाइल केल्यानंतर ३० दिवसांच्या आता तो वेरिफाय केला जाईल.
स्टेट बँकेच्या कोब्रँडेड क्रेडिट कार्डवर इन्श्युरन्स बंद
स्टेट बँक ऑफ इंडियाने आता स्टेट बँकेच्या कोब्रँडेड क्रेडिट कार्डवर इन्श्युरन्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन निर्णय ११ ऑगस्टपासून लागू होणार आहे.
Discussion about this post