चाळीसगाव । तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना चाळीसगावच्या तलाठीसह रोजगार सेवक व एक जण एसीबीच्या जाळ्यात अडकले. चाळीसगाव येथे वडिलोपार्जित शेत जमिनीच्या सात बा-यावर उताऱ्यावरील इतर हक्कातील जुनी कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी २५ हजाराची लाच घेतांना तलाठी मोमीन दिलशाह अब्दुल यांच्या कार्यालयाबोहर रोजगार सेवक वडिलाल रोहिदास पवार हे तक्रारदार यांच्याकडून २५ हजाराची लाचेची रक्कम घेतांना रंगेहाथ पकडले गेले.
या प्रकरणात तलाठी मोमीन दिलशाह अब्दुल, रोजगार सेवक वडिलाल रोहिदास पवार व दादा बाबु जाधव यांच्याविरुध्द चाळीसगाव शहर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडील व इतर सात यांचे मौजे पाथरजे तालुका चाळीसगाव येथे वडिलोपार्जित शेत जमिनीच्या सात उताऱ्यावरील ईतर हक्कातील जुनी कालबाह्य नोंद कमी होणेकरिता त्यांच्या वडिलांनी केलेला अर्ज घेऊन तलाठी यांच्या कार्यालयात गेले. येथे त्यांनी रोजगार सेवक यांना भेटण्यास सांगून त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे दिल्यावर तुमचे काम करून देतो असे सांगितले.
तर खासगी व्यक्ती दादा बाबू जाधव यांनी तक्रारदार यांना लाच देण्यासाठी अपप्रेरणा देऊन प्रोत्साहित केले.
यांनतर तक्रारदारांच्या तक्रारीनंतर 30 रोजी सापळा रचल्यानंतर आरोपी रोजगार सेवक पवार यांना तलाठी कार्यालयाबाहेर लाच स्वीकारताच अटक करण्यात आली व नंतर तलाठी व खाजगी पंटराला बेड्या ठोकण्यात आल्या व त्यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले.
Discussion about this post