नवी दिल्ली । भारतावर अतिरिक्त दंडासह २५ टक्के कर लादण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत व्यापार कराराची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत “अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये एक करार झाला आहे” अशी माहिती दिली. या अंतर्गत दोन्ही देश तेल साठ्यांच्या विकासावर काम करतील. ट्रम्प यांनी या करारातून भारताला पूर्णपणे डावलले असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी दक्षिण कोरियाबद्दलही एक महत्त्वाची घोषणा देखील केली आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत, “आम्ही पाकिस्तानशी एक करार केला आहे, ज्या अंतर्गत पाकिस्तान आणि अमेरिका त्यांच्या प्रचंड तेल साठ्यांच्या विकासावर एकत्र काम करतील. आम्ही एक तेल कंपनी निवडत आहोत जी या भागीदारीचे नेतृत्व करेल. कोणाला माहित आहे, कदाचित पाकिस्तान कधीतरी भारताला तेल विकेल!” असे म्हणत भारतालाही चिमटा काढला आहे.
भारतावर 25 टक्के टॅरिफ लागू
ट्रम्प यांनी 01 ऑगस्टपासून भारतीय आयातीवर 25 टक्के टॅरिफ आणि अतिरिक्त दंड लावण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे विधान केले आहे. नवी दिल्लीसोबत अमेरिकेची वाढती व्यापार तूट आणि भारताने रशियन तेल खरेदी केल्याचे कारण देत ट्रम्प यांनी ही कारवाई केली.
Discussion about this post