बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयाकरिता हा भरती करण्यात येणार आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिक सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव येथे ही भरती केली जाणार आहे. याबाबत माहिती https://portal.mcgm.gov.in/For prospects/Careers-All या वेबसाइटवर देण्यात आली आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे.
ही भरती क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ऑडिओलॉजीसह स्पीच थेरपिस्ट,स्पीच थेरपीस्ट-सी ऑडिओलॉजिस्ट, ब्लड बँक टेक्निशियन, ई.सी.जी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन या पदांसाठी भरती केली जाणार आहे. याचसोबत नेत्रतज्ज्ञ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
पात्रता
एकूण १९ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट पदासाठी संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. ऑडिओलॉजी सह स्पीच थेरपिस्ट पदासाठी ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपीमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. ई.सी.जी टेक्निशियन पदासाठी विज्ञान शाखेतून १२वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. याचसोबत कार्डिओ टेक्नोलॉजीमध्ये बीएस.सी केलेले असावे. न्युरोलॉजी टेक्निशियन पदावासाठी बी.पी.एम,टीअंतर्गत पदवी प्राप्त केलेली असावी. लॅब टेक्निशियन पदासाठी बी.एससी पॅरामेडिकल टेक्नोलॉजीसह इंटर्नशिप केलेली असावी.
या नोकरीसाठी तुम्हाला अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. १ऑगस्ट २०२५ पर्यंत हा अर्ज एल.टी.एमएस. रुग्णालयाचा आवक विभाग येथे पोहचणे आवश्यक आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला २०,००० ते ५०,००० रुपये पगार मिळणार आहे.
Discussion about this post