मुंबई । सभागृहात मोबाईलवर रमी गेम खेळतानाचा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आमदार रोहित पवार यांनी व्हिडीओ पोस्ट केला होता. यावरुन विरोधकांकडून कृषीमंत्र्यांवर चौफेर हल्ला करण्यात आला. आता माणिकराव कोकाटेंबाबतचा विधीमंडळाचा चौकशी अहवाल समोर आला आहे.
रोहित पवार यांनी थेट विधिमंडळाच्या चौकशीच्या अहवालाचा दाखला देत कोकाटे ४२ सेकंद नव्हे तर १८ मिनिटे पत्ते खेळत असल्याचा दावा केला आहे. हा अहवाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर झालाय.
सभागृहात तब्बल १८ ते २२ मिनिटे पत्ते खेळणाऱ्या कृषिमंत्र्यावर हे सरकार कारवाई करणार नसेल तर मुख्यमंत्र्यांना स्व. अटलजींच्या तर उपमुख्यमंत्री अजितदादांना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का? असाही दावा रोहित पवार यांनी केला आहे.झाल्यानंतर आमदार रोहित पावर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत कोकाटे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
दरम्यान, मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या आधी अजित पवार यांनी कोकाटे यांना झापलं. तुमच्यामुळे सरकारची बदमानी होतेय. बोलताना जरा भान ठेवा, अशा स्पष्ट शब्दात कोकाटे यांना समज दिली. त्यावर कोकाटे यांनीही यापुढे बोलताना काळजी घेईल,असे अश्वासन अजित पवार यांना दिले आहे. तुर्तास कोकाटे यांना अभय मिळाल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोकाटे यांचं मंत्रिपद बदलले जाऊ शकते, पण सध्या तशी कोणतीही हालचाल दिसत नाही.
Discussion about this post