केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO) एकूण २३० पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज आज २९ जुलै पासून सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १८ ऑगस्ट २०२५ आहे.सविस्तर सूचना upsc.gov.in ला भेट देऊन पाहता येईल.
अधिसूचनेनुसार, रिक्त पदांपैकी १५६ रिक्त पदे अंमलबजावणी अधिकारी (EO) / लेखा अधिकारी (AO) आणि उर्वरित ७४ रिक्त पदे सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (APFC) यांच्या आहेत. अंमलबजावणी अधिकारी (EO) / लेखा अधिकारी (AO) यांच्या भरतीमध्ये ७८ पदे राखीव आहेत.
१ पद EWS साठी, ४२ पदे OBC साठी, २३ SC आणि १२ ST श्रेणीसाठी राखीव आहेत. सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त भरतीमध्ये ३२ पदे राखीव आहेत. ०७ EWS साठी, २८ OBC साठी, ७ SC श्रेणीसाठी राखीव आहेत.
पात्रता निकष आणि निवड प्रक्रिया
अंमलबजावणी अधिकारी / लेखा अधिकारी
पात्रता: मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून कोणत्याही विषयात बॅचलर पदवी.
वयोमर्यादा: कमाल ३० वर्षे. एससी आणि एसटी श्रेणींना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षे सूट मिळेल आणि ओबीसींना तीन वर्षे सूट मिळेल.
सहाय्यक पीएफ आयुक्त
जास्तीत जास्त ३५ वर्षे. राखीव श्रेणीला केंद्र सरकारच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादेत सूट दिली जाईल. एससी आणि एसटी श्रेणींना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षे सूट मिळेल आणि ओबीसींना तीन वर्षे सूट मिळेल.
निवड प्रक्रिया
यूपीएससी द्वारे ईपीएफओ अंमलबजावणी अधिकारी/खाते अधिकारी पदांसाठी उमेदवारांची अंतिम निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे तयार केलेल्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
Discussion about this post