मुंबई । कृषीमंत्रि माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांनी कोकाटे यांना वादग्रस्त वक्तव्यावरून झापलेय. बोलताना भान ठेवा, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होते. सतत चुका करता.. कितीदा चुकणार आणि कितीदा माफ करणार, असे म्हणत अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले आहेत. अजित पवार यांनी यावेळी कोकाटे यांच्या राजीनाम्याचे संकेत देण्यात आले.
वादग्रस्त वक्तव्य आणि अधिवेशनात रमी खेळणारे कृषीमंत्रि माणिकराव कोकेटा यांच्यावर विरोधकांकडून धारेवर धरले जात आहे. आज मंत्रालयात कोकाेटे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली. यावेळी अजित पवार यांनी कोकाटे यांना चांगलेच झापले. तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवा. तुम्हाला कितीवेळा माफ करायचे, असे अजित पवार यांनी कोकाटे यांना सांगितले.
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणा विरोधकांकडून करण्यात येत आहे. रमी प्रकरणावरून स्पष्टीकरण देताना माणिकराव कोकाटे यांनी सरकार भिकारी असल्याचे वक्तव्य करत वाद ओढावून घेतला होता. त्यामुळे सरकारवर टीका झाली होती. त्यामुळे कोकाटे यांच्याकडून मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार का? या चर्चेने जोर धरला होता. आता अजित पवार यांनी कोकाटे यांना झापत यामध्ये भर घातली आहे. माणिकराव कोकाटे यांना अभय मिळण्याची शक्यता कमीच आहे. मागील सहा महिन्यात माणिकराव कोकाटेंमुळे सरकार पाच ते सहा वेळा वादात अडकले आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Discussion about this post