बँकेत नोकरी मिळवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 ऑगस्ट 2025 आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण १६७ पदे भरली जाणार आहे.
कोणती पदे भरली जाणार?
ज्युनिअर श्रेणी अधिकारी – 44
असोसिएट – 50
टंकलेखक – 9
वाहनचालक – 6
शिपाई – 58
भरतीसाठी पात्रता काय?
ज्युनिअर श्रेणी अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान 50 टक्के गुणांसह असावा आणि मॅट्रिकची परीक्षा मराठी विषयांसह उत्तीर्ण असावा. कायद्यात बॅचलर/मास्टर्स किंवा JAIIB/CAIIB/MSCIT प्रमाणपत्र पूर्ण केलेले किंवा ट्रेझरी/आंतरराष्ट्रीय बँकिंग विभाग विभागात कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
असोसिएट – कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान 50 टक्के गुणांसह असावा आणि मॅट्रिकची परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण असावा.
टंकलेखक – प्रति मिनिट मराठी टायपिंगमध्ये ३० श.प्र.मि. आणि प्रति मिनिट इंग्रजी टायपिंगमध्ये ४० श.प्र.मि..
संगणक अनुप्रयोगांमध्ये (वर्ड प्रोसेसिंग आणि स्प्रेडशीट) प्रवीणता असणे आवश्यक
वाहनचालक – मराठी विषयासह 10 उत्तीर्ण केलेली असावी आणि त्याच्याकडे वैध एलएमव्ही परवाना असावा.
शिपाई – मराठी विषयासह 10 उत्तीर्ण केलेली असावी. इलेक्ट्रिशियन / प्लंबिंग कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वयोमर्यादा किती?
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जून 2025 रोजी 18 ते 32 वर्षे असणे गरजेचं आहे.
किती पगार?
निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार पगार मिळेल, दरमहा 25000 ते 52 हजार 100 रुपये पगार मिळणार
अधिकृत संकेतस्थळ – https://www.mscbank.com/
Notification : Click Here
Discussion about this post