तुम्हीही दहावी पास असाल आणि केंद्र सरकारच्या नोकरीचे स्वप्न पाहात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. इंटेलिजेंस ब्युरोमध्ये सिक्युरिटी असिस्टंट/ एक्झिक्युटिव्ह एग्जामिनेशन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.
इंटेलिजेंस ब्युरोमधील या नोकरीसाठी एकूण ४९८७ पदे भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया २६ जुलै २०२५ पासून सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२५ आहे. इच्छुकांनी मुदतीपूर्वी अर्ज करावेत.
ज्या तरुणांना सरकारी नोकरी करायची आहे. त्यांना आयबीमध्ये काम करण्याची ही उत्तम संधी आहे. या नोकरीसाठी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात. तुम्ही गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर www.mha.gov.in जाऊन अर्ज करु शकतात.
१० वी पास उमेदवारांसाठी उतम संधी
या नोकरीसाठी उमेदवारांनी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी उमेदवार ज्या राज्याचे रहिवासी आहेत त्याच ठिकाणासाठी अर्ज करु शकतात. तसेच उमेदवारांना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.
इंटेलिजेंस ब्युरोमधील नोकरीसाठी १८ ते २७ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सूट देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/94478/Index.html या वेबसाइटवर क्लिक करा.
यानंतर रजिस्टर करा. त्यानंतर तुमची माहिती भरुन लॉग इन करा.
यानंतर तुम्हाला दिलेली सर्व माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा. यानंतर प्रिंट आउट काढून तुमच्याजवळ ठेवा.
या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला ५५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ६५० रुपये शुल्क भरायचे आहे.
Discussion about this post