पुणे । पुण्यामधील खराडी येथे अलिशान फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये रोहिणी खडसे यांच्या नवऱ्याला प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत एकूण सात जणांना अटक केली असून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे.
पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन सुरू होते. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या पार्टीबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी पार्टीच्या ठिकाणी धाड टाकून तिथे उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले. रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये 2 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. या छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर देखील असल्याची माहिती समोर आली आहे.
Discussion about this post