जर तुमची डी.एड किंवा बी.एड झाली असेल आणि तुम्हाला शिक्षक होण्याचं स्वप्न असेल, तर ही महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे.पुणे महानगरपालिकेत शिक्षक पदासाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2025 आहे. अर्ज करण्यासाठी काही दिवस उरले असून पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता अर्ज करावा. या भरतीद्वारे एकूण २८४ रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
पदाचे नाव :
1) प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) 213
2) प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) 71
आवश्यक पात्रता:
पद क्र.1: D.Ed./B.Ed. (मराठी माध्यम)
पद क्र.2: D.Ed./B.Ed. (इंग्रजी माध्यम)
वयाची अट:
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे 22 जुलै 2025 रोजी किमान 18 ते कमाल 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज शुल्क : नाही
अर्ज सादर करण्याचा पत्ता: शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे 05
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 29 जुलै 2025
जाहिरात (PDF) |
मराठी माध्यम: Click Here |
इंग्रजी माध्यम: Click Here |
Discussion about this post