जळगाव । राज्यात हनीट्रॅप प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रफुल्ल लोढावरून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. या राजकीय युद्धात आता भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी उडी घेतली आहे. मंगेश चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना खडसेंना अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरली आहे.
“मातब्बर नेते कुणाला म्हणत आहात? हे आधी समजून घ्या. एकनाथ खडसे हा मातब्बर नेता होऊच शकत नाही. तो भिकारXX नेता आहे. त्याने ज्या पद्धतीने आता हे वक्तव्ये चालू केले आहेत. कुठलेही पुरावे नाहीत. एकनाथ खडसे अपुऱ्या माहितीच्या आधारे नेत्यांची बदनामी करत आहेत”, असा घणाघात मंगेश चव्हाण यांनी केली. “योग्य वेळ आल्यानंतर योग्य थांबवण्याच्या गोळ्या दिल्या जातील’, असाही दम मंगेश चव्हाण यांनी दिला.
एकनाथ खडसे हे कोणत्याही पुरावा शिवाय मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते माध्यमांच्या समोर आणावेत. या उलट एकनाथ खडसे यांच्या रंगल्या रात्रीची माहिती आपल्याकडेही आहेत. त्यांनी म्हटलं तर आपण त्यांच्या मुक्ताईनगर येथे जाऊन ही त्यांना दाखवू शकतो असे थेट आव्हान आमदार मंगेश चव्हाण यांनी खडसे यांना दिले आहे.
Discussion about this post