मुंबई । राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते अडचणीत आले आहे. हा व्हिडीओ समोर येताच राज्यात वातावरण चांगलंच तापलं. विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली. अशातच माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार असल्याचा चर्चेने जोर धरलाय.
अजित पवार येत्या मंगळवारी त्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेणार असल्याची माहिती मिळालीय. आज छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. याभेटी दरम्यान अजित पवार यांनी घाडगे यांना त्याबाबत शब्द दिलाय. तसेच सूरज चव्हाण यांना पक्षात घेणार नसल्याचही यावेळी अजित पवार यांनी म्हटलंय.
आज पुण्यात विजय घाटगे यांनी उपमुख्यंमत्री अजित पवारांची भेट घेतली. भेट झाल्यानंतर घाटगे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी अजित पवार आपल्याशी काय बोलले यांची माहिती घाडगे यांनी दिली. जे झालं ते अत्यंत चुकीचं झालं. महाराष्ट्रातील राजकारणात असं व्हायला नको होतं, असं अजित पवार म्हणालेत. तर मारहाण करणाऱ्या आरोपींवर किरकोळ गुन्हे दाखल केलेत. तर काहींना सोडून दिल्याची सांगितल्यानंतर अजित पवार यांनी स्वत: लातूर पोलिसांशी चर्चा केलीय. अशी प्रकार खपवून घेतलं जाणार नाहीत, असं स्पष्टपणे त्यांनी पोलिसांना सांगितलं, असं विजय घाडगे म्हणालेत.
त्याचबरोबर अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्या निर्णयासाठी वेळ मागितला आहे, असेही घाडगे म्हणालेत. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा न घेतल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा घाडगे यांनी दिला होता, त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी वेळ मागितल्याचं घाडगे म्हणाले.
Discussion about this post