मुंबई । विधानसभेत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर ऑनलाइन रमी (पत्ते) खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात असून कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं काढून घेतलं जाणार असल्याची माहिती समोर आलीय.
कित्येक वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणारे, सरकारला अडचणीत आणआणारे माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद काढून न घेता त्यांच्या खात्यात फक्त बदल करून त्यांना अभय दिले जाणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधीलच दुसरे मंत्री असलेले मकरंद आबा पाटील यांच्याकडे कृषी खात्याच कारभार सोपवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मकरंद पाटील यांच्याकडे सध्या मदत आणि पुनर्वसन खातं आहे. पाटील यांच्याकडे कृषीमंत्रीपद सोपवल्यानंतर त्यांचं मदत आणि पुनर्वसन खातं हे कोकाटे यांना देणार अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. परंतु पहिल्यांदाच त्यांना मंत्री केले कोकाटे यांना लगेच त्यांचे मंत्रीपदावरून काढणे योग्य ठरणार नसल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत असल्याचे समजते.
Discussion about this post