नवी दिल्ली । काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेल्या युद्धबंदीबद्दल सरकारला प्रश्न विचारला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी केली, हे संपूर्ण जगाला माहिती आहे आणि हे सत्य लपवता येत नाही असं राहील गांधी म्हणाले.
सध्या संसदीय अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान संसदेच्या बाहेर राहुल गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींना युद्धबंदीबद्दल विचारले असता ते म्हणाले की ट्रम्प यांनी २५ वेळा सांगितले आहे की मी युद्धबंदी केली आहे. युद्धबंदी करणे ट्रम्प कोण आहेत, हे त्यांचे काम नाही, परंतु पंतप्रधानांनी एकदाही उत्तर दिले नाही.
ट्रम्प यांनी युद्धबंदी केली, हे संपूर्ण जगाला माहिती आहे. हे सत्य आहे, सत्य लपवता येत नाही. हे फक्त युद्धबंदीबद्दल नाही, खूप मोठ्या समस्या आहेत, ज्यांवर आपण चर्चा करू इच्छितो, संरक्षणाच्या समस्या आहेत, संरक्षण उद्योगाशी संबंधित समस्या आहेत, ऑपरेशन सिंदूरच्या समस्या आहेत, परिस्थिती चांगली नाही. संपूर्ण देशाला माहिती आहे, जे स्वतःला देशभक्त म्हणवतात, ते पळून गेले… पंतप्रधान विधान देऊ शकत नाहीत.”
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा केली जाईल, सरकारने हे मान्य केले आहे पण ते कधी होईल हे माहित नाही… त्यांनी म्हटले आहे की पंतप्रधान परतल्यावर ते होईल.” असंही राहुल गांधी म्हणाले.
Discussion about this post