मुंबई । जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अशातच संजय राऊतांनी राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्याच्या राजकारणाबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. येत्या सप्टेंबर महिन्यात काहीतरी मोठं घडणार आहे, असे संजय राऊत म्हणाले. तसेच धनखड यांच्या राजीनाम्यामागील कारणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
सप्टेंबर महिन्यात काहीतरी मोठं घडणार, मी याबद्दल जास्त काही बोलू शकत नाही. पण पडद्याच्या मागे काही तरी मोठे राजकारण सुरु आहेत. दिल्लीच्या राष्ट्रीय राजकारणात पडद्याच्या मागे काही अशा गोष्टी होत आहेत, त्या लवकरच समोर येतील, असे संजय राऊत म्हणाले.
उपराष्ट्रपतींनी ज्या प्रकारे राजीनामा दिला आहे ती काही साधारण घटना नाही, असे मला वाटतं. त्यांनी जे तब्येतीचे कारण दिले आहे, ते मला मान्य नाही. ते अतिशय स्वस्थ आणि आनंदी राहणारे व्यक्ती आहेत. ते अशाप्रकारे मैदान सोडून जाणारे व्यक्ती नाहीत. आमचे त्यांच्यासोबत मतभेद असू शकतात, पण ते सहजरित्या मैदान सोडणारे व्यक्ती नाहीत. ते लढणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. ते एकदम ठणठणीत आहेत. मी दिवसभर त्यांना पाहिलं आहे, त्यांची तब्येत अतिशय चांगली आहे, असेही संजय राऊतांनी सांगितले.
Discussion about this post