चमोली । उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. चमोली जिल्ह्यात अलकनंदा नदीच्या काठावर ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन 10 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात इतर अनेक जण जखमी झाले आहेत. विजेच्या धक्क्याने सुमारे दोन डझन लोक गंभीररीत्या भाजल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिपोर्टनुसार, हा सीवर प्लांट नमामि गंगे प्रकल्पांतर्गत सुरू आहे. या अपघाताबाबत ऊर्जा महामंडळाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप संतप्त नागरिक करत आहेत. महामंडळावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे.
ANI च्या वृत्तानुसार, ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात तब्बल 10 जणांचा मृत्यू झाला झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. अलकनंदा नदीजवळ हा स्फोट झाला. त्यानंतर तिथे विद्युत प्रवाह उतरला. त्याचा फटका अनेकांना बसला.या घटनेत 1 पोलिस कर्मचारी व 2 होमगार्डही या घटनेत जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
Discussion about this post