सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड विविध पदांसाठी भरती सुरु आहे . तरी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. एकूण १८० पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी महावितरण कंपनी पात्र उमेदवारांकडून अर्ज आमंत्रित करत आहे. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करु शकतात.
या भरतीसाठी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने ऑगस्ट महिन्यात होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पदाच्या अनुभव आणि दर्जानुसार ७३,५८० ते १,६६,५५५ पर्यंत मासिक वेतन मिळेल. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट mahadiscom.in वर जाऊन अर्ज करावा.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
उमेदवाराकडे BE किंवा B.Tech पदवी असावी (इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल शाखेत). पदाच्या प्रकारानुसार ३५ वर्षांपासून ४० वर्षांपर्यंत वयोमर्यादा निश्चित आहे. आरक्षणाच्या नियमांनुसार वयोमर्यादेमध्ये सुट लागू असेल.
निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया ही दोन पद्धतीने होणार आहे
ऑनलाईन परीक्षा
मुलाखत
परीक्षा स्वरूप
अर्ज कसा कराल
अधिकृत संकेतस्थळावर जा – http://www.mahadiscom.in
New Regisration वर क्लिक करा
आवश्यक माहिती भरून खाते तयार करा
लॉगिन करुन अर्ज करा
फोटो, स्वाक्षरी व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
अर्जाची प्रिंट आऊट घ्या आणि भविष्यासाठी सुरक्षित ठेवा.
Discussion about this post