मुंबई । महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे मुंबईतील एका हॉटेलमध्ये एकत्र आल्याचं वृत्त असून दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त भेट झाली असल्याचं माध्यमांत वृत्त येत आहे.या भेटीच्या वृत्ताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे हे दोन्ही नेते सॉफिटेल हॉटेलमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी पोहोचले होते. दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त भेट झाली असल्याचं वृत्त समोर येत असलं तरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. भाजप सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही नेते हे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये पोहोचले होते आणि दोघांची कोणत्याही प्रकारची गुप्त भेट झालेली नाहीये. या भेटीच्या वृत्ताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा आदित्य ठाकरे यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये.
मात्र, अधिवेशनाच्या दरम्यान उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर काही वेळातच सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरेंना ऑफरच दिली होती
Discussion about this post