आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्ली यांनी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत विविध गट-ब आणि क पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ३१ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
या भरतीद्वारे, एम्सने २३०० हून अधिक रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे विविध पदांची भरती केली जाईल. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत सहभागी होणाऱ्या एम्स आणि केंद्र सरकारी रुग्णालयांमध्ये विविध गट-ब आणि क पदांवर नियुक्ती केली जाईल.
या पदांसाठी होणार भरती?
या भरती प्रक्रियेद्वारे तंत्रज्ञ, ज्युनियर रेडिओग्राफर, रेडिओग्राफर, फार्मासिस्ट, लाईफ गार्ड, व्होकेशनल कौन्सिलर, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन असिस्टंट, ड्रायव्हर, मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसर ग्रेड II, ज्युनियर वॉर्डन, पर्सनल असिस्टंट, स्टेनोग्राफर, सीनियर नर्सिंग ऑफिसर, वर्कशॉप टेक्निशियन ग्रेड II, कोडिंग क्लर्क, मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, न्यूक्लियर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, ईसीजी टेक्निशियन, रेस्पिरेटरी लॅबोरेटरी असिस्टंट, फार्मासिस्ट (आयुर्वेदिक) इत्यादी पदांवर भरती केली जाईल.
वयश्रेणी :
अर्जदारांची वयोमर्यादा पदानुसार साधारणपणे १८ ते ३५ वर्षे असते. एससी/एसटी (५ वर्षे), ओबीसी (३ वर्षे) आणि पीडब्ल्यूबीडी (१० वर्षे) यासारख्या राखीव श्रेणींसाठी सरकारी नियमांनुसार वयात सूट उपलब्ध आहे.
परीक्षेची तारीख
या भरती मोहिमेसाठीची परीक्षा २५ ते २६ ऑगस्ट दरम्यान घेतली जाईल. परीक्षेच्या दिवसाच्या एक आठवडा आधी परीक्षा शहर माहिती स्लिप प्रसिद्ध केली जाईल. नोंदणीकृत उमेदवारांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या तीन दिवस आधी वेबसाइटवर अपलोड केले जातील.
आवश्यक पात्रता
या भरती मोहिमेत मागितलेली शैक्षणिक पात्रता पदांनुसार बदलते. मान्यताप्राप्त मंडळाच्या १० वी पास ते एमएससी पदवीपर्यंतच्या उमेदवारांना एम्समध्ये नोकरी मिळण्याची संधी आहे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळ्या पात्रता अटी विहित करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचना काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात येत आहे, जेणेकरून ते संबंधित पदाच्या पात्रता निकषांची पूर्तता करतात याची खात्री होईल. अधिसूचनेत प्रत्येक पदाच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि इतर आवश्यकतांची संपूर्ण माहिती दिली आहे.
निवड प्रक्रिया
AIIMS CRE निवड प्रक्रियेत लेखी चाचणी आणि कौशल्य चाचणी असे अनेक टप्पे असतात. लेखी परीक्षेत, उमेदवारांना दोन वेगवेगळ्या विभागांमधून प्रत्येकी चार गुणांचे एकूण १०० MCQ दिले जातील. दुसऱ्या फेरीत, निवडलेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाईल.
अर्ज कसा करायचा
१. AIIMS CRE अर्ज भरण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in वर जा.
२. वेबसाइटच्या होम पेजवरील भरती बटणावर क्लिक करा आणि ‘कॉमन रिक्रूटमेंट एक्झामिनेशन (CRE)’ या अधिसूचनेवर क्लिक करा.
३. आता तुम्हाला Create New Account वर क्लिक करून आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करावी लागेल.
४. नोंदणीनंतर, उमेदवार इतर तपशील भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात.
५. शेवटी, विहित शुल्क भरा आणि पूर्णपणे भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घ्या आणि ती सुरक्षित ठेवा.
Discussion about this post