जळगाव, | महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्राथमिक (इ.५वी ते ८वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही नोंदणी दि. १७ जुलै २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून, संबंधित विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
या प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना तीन टप्प्यांमध्ये अर्ज सादर करावयाचे आहेत. पहिल्या टप्प्यात, १७ जुलै ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान विद्यार्थी स्वतः ऑनलाईन नोंदणी अर्ज भरतील. दुसऱ्या टप्प्यात, ४ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ दरम्यान विद्यार्थ्यांनी मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क केंद्र.शाळेकडे सादर करावयाची आहेत. अंतिम टप्प्यात, २३ ऑगस्ट २०२५ रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज व इतर कागदपत्रे मंडळाकडे जमा करावयाचे आहेत.
नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, विद्यार्थ्यांनी http://msbos.mh-ssc.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज भरायचा आहे. अर्ज करताना विद्यार्थ्यांनी सर्व माहिती अचूक भरावी व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे मंडळाचे स.प्र. अधिकारी प्रमोद गोफणे यांनी स्पष्ट केले आहे.
Discussion about this post