जळगाव | भारतीय जनता पक्षाकडून नवीन जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आलेली असून त्यात जळगाव जिल्ह्यासाठी आज तीन नविन जिल्हाध्यक्ष मिळाले आहे. यामध्ये तरूण चेहर् यांसह महिला नेतृत्वाला संधी देण्यात आली आहे
भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची निवडीची चर्चा होत होती. आज अखेर आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही निवड जाहीर केली आहे. जळगाव जिल्ह्यासाठी तीन जिल्हाध्यक्ष जाहीर केले आहेत. यात रावेर लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हरीभाऊ जावळे, जळगाव लोकसभेच्या जिल्हाध्यक्षपदी ज्ञानेश्वर महाराज जळकेकर तर जळगाव महानगराध्यक्षपदी नगरसेविका उज्वला बेंडाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Discussion about this post