मुंबई । विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ संपत असून त्यांचे या टर्ममधील शेवटचे अधिवेशन असल्यामुळे आज त्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. यादरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्री यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खुली ऑफर दिली आहे, ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
अंबादास दानवे यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपला आहे, त्यांच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. उद्धवजी 2029 पर्यत काहीही स्कोप नाही, आम्हाला त्या बाकावर यायचा स्कोप नाही, तुम्हाला इथं यायचं असेल तर बघा, स्कोप आहे. ते आपण वेगळ्या पद्धतीने बोलू, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सत्तेत येण्याची ऑफर दिली आहे, फडणवीस यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष असल्याचंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंबईमध्ये पाच जुलै रोजी विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधुंची उपस्थिती होती, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवेसना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती होती, या मेळाव्यानंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा रंगली आहे, याच दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिल्यानं फडणवीसांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ठाकरेंचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष असल्याचंही ते यावेळी म्हणाले आहेत.
Discussion about this post