मुंबई : जर तुम्हीही देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. SBIने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा दिला देत गृहकर्ज आणि कार कर्जावरील व्याजदर कमी केले आहेत. यामुळे जुन्या गृहकर्जाचा ईएमआय किंवा कालावधी कमी होऊ शकतो.
एसबीआयने एमसीएलआरमध्ये ०.२५ टक्के कपात केली आहे. हे नवीन दर १५ जुलै २०२५ पासून लागू झाले आहेत. यावेळी MCLR म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लँडिंग रेटमध्ये 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे.
रात्रभर आणि १ महिन्याचा एमसीएलआर: ७.९५% पर्यंत वाढला. पूर्वी ८.२० टक्के होता.
३ महिन्यांचा एमसीएलआर: ८.५५% वरून ८.३५% पर्यंत कमी.
६ महिन्यांचा एमसीएलआर: ८.९०% वरून ८.७०% पर्यंत कमी.
१ वर्षाचा एमसीएलआर: ९.००% वरून ८.८०% पर्यंत कमी केला.
२ वर्षांचा एमसीएलआर: ९.०५% वरून आता ८.९५% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
३ वर्षांचा एमसीएलआर: ९.१०% वरून ८.९०% पर्यंत कमी.
एसबीआयच्या या पावलामुळे येत्या काळात ईएमआयमध्ये दिलासा मिळू शकतो. विशेषतः ज्या ग्राहकांना कर्जाचा व्याजदर MCLR किंवा इतर फ्लोटिंग दरांशी जोडलेला आहे त्यांना याचा फायदा होईल. तुम्ही नवीन गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल किंवा टॉप-अप करायचे असेल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
Discussion about this post