नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. इंदिरा गांधी इंटरनॅशनल (आयजीआय) एव्हिएशन सर्व्हिसेसने इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. तब्बल १,४४६ पदांसाठी ही भरती होणार आहे. विमान वाहतूक क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ही एक उत्तम संधी आहे.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी १०वी आणि १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार असून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया २१ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालेल.
पात्रता :
विमानतळ ग्राउंड स्टाफ- १,०१७ जागा
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान १२वी उत्तीर्ण असावा किंवा समकक्ष. वय १८ ते ३० वर्षे असावे. ज्यांची या पदासाठी दरमहा २५,००० ते ३५,००० रुपये आकर्षक पगार आहे. एकूण १,०१७ जागा उपलब्ध आहेत.
लोडर (फक्त पुरुष) -४२९ रिक्त जागा
किमान १० वी पास असले पाहिजेत. अर्जदार पुरुष आणि २० ते ४० वर्षे वयोगटातील असले पाहिजेत, या पदासाठी अपेक्षित वेतन दरमहा १५,००० ते २५,००० रुपये दरम्यान आहे. लोडरसाठी ४२९ रिक्त जागा आहेत.
अर्ज कसा करावा
या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अर्ज लिंक सक्रिय झाल्यानंतर येथे सांगिलेल्या माहितीचे पालन करा.
१. अधिकृत वेबसाइट, igiaviationdelhi.com ला भेट द्या आणि होम पेजवर अर्ज करण्यासाठी फॉर्म पहा.
२. अचूक तपशीलांसह ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
३. आवश्यकतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
४. लागू परीक्षा शुल्क भरा.
५. फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत जतन करा.
Discussion about this post