सरकारी नोकरी शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. आर्म्ड व्हेईकल कॉर्पोरेशन लिमिटेड (AVNL) अंतर्गत हेवी व्हेईकल फॅक्टरी (HVF) ने ज्युनियर टेक्निशियनच्या 1800 हून अधिक पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.
विशेष या भरतीची अर्ज प्रक्रिया सुरु असून इच्छुक उमेदवार oftr.formflix.org या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. ही संधी विशेषतः तांत्रिक क्षेत्रात अनुभव मिळवू इच्छिणाऱ्या आणि संरक्षण उद्योगात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी उत्तम आहे.
उमेदवाराची पात्रता काय?
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव देखील मागवण्यात आला आहे. कमाल वयोमर्यादा 35 वर्षे निश्चित करण्यात आली आहे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार सूट मिळेल, ओबीसींना 3 वर्षे, एससी/एसटींना 5 वर्षे आणि अपंगांना 10 वर्षे सूट देण्यात येणार आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 300 निश्चित करण्यात आले आहे. तर एससी/एसटी/ईडब्ल्यूएस, महिला आणि माजी सैनिकांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. निवड प्रक्रिया दोन टप्प्यात असेल. प्रथम आयटीआयमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे शॉर्टलिस्टिंग केले जाईल आणि नंतर ट्रेड टेस्ट होईल. अंतिम गुणवत्ता यादी आयटीआय गुण आणि ट्रेड टेस्ट कामगिरीवर आधारित असेल.
पगार आणि सुविधा
निवडलेल्या उमेदवारांना दरमहा 21000 रुपये पगार मिळेल. याशिवाय, दरवर्षी आयडीए, विशेष भत्ता आणि 3 टक्के वाढ देखील उपलब्ध असेल.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
अर्ज करताना, उमेदवारांना आयटीआय प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), आणि अनुभव प्रमाणपत्र अशी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
कसा कराल अर्ज?
सर्वप्रथम, उमेदवारांनी oftr.formflix.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
त्यानंतर उमेदवारांनी “ऑनलाइन अर्ज करा” वर क्लिक करावे.
यानंतर, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर यासारखे तपशील भरा.
पायरी ४: कागदपत्रे आणि फोटो/स्वाक्षरी अपलोड करा.
श्रेणीनुसार अर्ज शुल्क भरा.
सबमिट करा आणि फॉर्मची प्रिंट आउट घ्या आणि सेव्ह करा.
Discussion about this post