मुंबई । तुम्हीही सोने खरेदीचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार आहे.
आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० तोळा ७१० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोनं खरेदी करताना आता तुम्हाला खूपच जास्त पैसे मोजावे लागणार आहे.आज सोनं किंवा चांदी खरेदी करायला जाण्यापूर्वी १८, २२ आणि २४ कॅरेटचे देर किती आहेत ते जाणून घ्या.
गुड रिटर्न्स या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ७१० रुपयांनी वाढ झाली असून या सोन्याची किंमत ९९,७१० रुपयांवर पोहचले आहे. जीएसटीसह हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १ लाखांपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागतील.
तर, आज २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ६५० रुपयांनी वाढ झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९१,४०० रुपये खर्च करावे लागतील. तर आज २२ कॅरेटचे १० तोळे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ९,१४,००० रुपये मोजावे लागतील. त्याचसोबत, तर १८ कॅरेट सोन्याच्या दरात देखील आज वाढ झाली आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ५४० रुपयांनी वाढ झाली असून आज हे एक तोळा सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ७४,७९० रुपये खर्च करावे लागतील. तर १० तोळे खरेदी करण्यासाठी ७,४७,९०० रुपये द्यावे लागतील.
तर देशात आज सोन्यासोबतच चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. आज एक ग्रॅम चांदीच्या दरात ४ रुपयांनी वाढ झाली आहे. १० ग्रॅममध्ये ४० तर १०० ग्रॅम चांदीच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीच्या दरात ४००० रुपयांनी वाढ झाली आहे. आज एक किलो चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,१५,००० रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे चांदी खरेदी करताना देखील तुमच्या खिशाला कात्री लागणार आहे.
Discussion about this post