मुंबई । शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये राडा केला. निकृष्ट दर्जाच जेवण दिलं म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
सध्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदार मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात थांबतात. तिथेच असलेल्या कॅंटिनमधून जेवणाची सोय केली जाते. मात्र काल रात्री, शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी जेवण मागविले होते. मात्र, जेवण आल्यावर डाळीला दुर्गंधी येत असल्याचा त्यांचा आरोप आहे. इतकंच नाही तर त्यांनी उलटी झाल्याची माहितीही दिली आहे.
Shiv Sena Shinde faction MLA Sanjay Gaikwad beat up the canteen staff at the MLA Guest House over bad food. @Shivsenaofc pic.twitter.com/pX61kACT4u
— Visshal Singh (@VishooSingh) July 9, 2025
आमदार निवासातच अशा प्रकारचे निकृष्ट जेवण मिळत असल्याने संतप्त झालेल्या आमदार संजय गायकवाड यांनी बनियन आणि लुंगीवरच कँटिनमध्ये धडक दिली. त्यांनी कँटिन व्यवस्थापक आणि आचाऱ्याला याचा जाब विचारला. कँटिनमधून मागवलेल्या डाळीला वास येत असल्याचे त्यांनी कँटिन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. एका आमदाराला जर एवढं वाईट जेवण देत असाल तर सामान्य लोकांना काय खाऊ घालत असाल असा सवाल त्यांनी केला. यानंतर संतापलेल्या गायकवाड यांनी कँटिन कर्मचाऱ्यांना शिविगाळ करत मारहाण केली. आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला जोरदार ठोसेही लगावले. त्यांच्यासोबत असलेल्या एका कार्यकर्त्याने देखील कर्मचाऱ्याला मारहाण केली.
Discussion about this post