जळगाव | जळगाव शहरातील शिवाजीनगर हुडको भागात भर दिवसा हवेत गोळीबार करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी चौकशी सुरू केली आहे
शिवाजीनगर हुडको परिसरात एका ठिकाणी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास भांडण सुरू झाले. पूर्व वैमनस्यातील वादातून हे भांडण चिघळले. यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. इतक्यात वाद घालणार्यांपैकी एकाने हवेत गोळीबार केला. यामुळे जमलेले लोक तेथून तात्काळ निघून गेले.
या प्रकाराची माहिती मिळताच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हवेत गोळीबार करणार्याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील संशयिताची कसून चौकशी सुरू असून तो आधी देखील एका गंभीर गुन्ह्यातील आरोपी असून जामीनावर सुटून बाहेर आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
याप्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे रतन गीते, प्रफुल्ल धांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे अक्रम शेख, प्रीतम पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित आरोपी दीपक बागुल याला ताब्यात घेतले आहे
Discussion about this post