जळगाव | जिल्ह्यात अपघाताच्या दिवसेंदिवस वाढत चालल्या असून याच दरम्यान, आता जळगाव ते आसोदा रोडवर भीषण अपघात झाला. यात एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच दुचाकीस्वार दुसरा तरुण जखमी झाला आहे. मोहम्मद इब्राहिम खाटीक (वय ३८, रा. भादली) असं अपघातातील मृत तरुणाचे नाव आहे
याबाबत असे की, भादली येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद इब्राहिम खाटीक (वय-३८) या तरुणाचे जळगाव शहरात कपड्याचे दुकान आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तो मित्र जावेद जाकिर पटेल (वय-२९, भादली ) याच्यासह दुचाकीने जळगावला येत होता. धनाजी पेट्रोल पंपाजवळ खारी डोह जवळ एका भरधाव कार चालकाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली.
अपघातात चारचाकीचे चाक छातीवरून गेल्याने मोहम्मद इब्राहिम खाटीक हा गंभीर जखमी झाला. त्याला लागलीच उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. इब्राहिमच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. घटनेनंतर जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल कारण्याचे काम सुरु होते.















Discussion about this post