पुणे महानगरपालिकेत भरती निघाली आहे. पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, पुणे महानगरपालिकेद्वारे ही भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहे. या नोकरीबाबत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती सर्व माहिती देण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिका, पुणे शहर एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी भरती करण्यात येणार आहे. समुपदेशक पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी. तसेच मास्टर ऑफ सोशल वर्क पदवी असावी. एच.आय.व्ही एड्स विषयी काउंसलिंगचा ३ वर्षाचा अनुभव असावा.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Lab Technician) पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी एस.सी. व डि.एम.एल.टी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच एच आय व्ही रक्तचाचणी लॅबमध्ये ३ वर्षाचा कामाचा अनुभव असावा. एकूण १२ पदे भरण्यात येणार आहे.
या नोकरीसाठी उमेदवारांनी ९ जुलै २०२५ पर्यंत अर्ज पाठवायचा आहे. अर्जाचा नमुना देण्यात आला आहे. त्यानुसार कागदपत्रे पाठवायची आहेत. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला पासपोर्ट साइज फोटोदेखील पाठवायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज पुणे शहर एड्स निंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, १ला मजला, ६६३, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे ४११००२ येथे पाठवायचा आहे.
Discussion about this post