SAIL म्हणजे स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. SAIL ने स्पेशलिस्ट/जीडीएमओ या पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. सरकारी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
या नोकरीसाठी तुम्हाला sailcareers.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी भरती वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.हा इंटरव्ह्यू २३ जुलै २०२५ रोजी होणार आहे. सकाळी ९.३० ते ११ वाजेपर्यंत रिपोर्ट करणे आवश्यक आहे.
पात्रता
सेलमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस किंवा पीजी डिप्लोमा केलेला असावा. याचसोबत इतर पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ६९ वर्षे निश्चित करण्यात आलं आहे.
पगार
स्पेशलिस्ट/ GDMO पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना १,६०,००० ते १,८०,००० रुपये पगार मिळणार आहे. जीडीएमओ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ९०,००० ते १,००,००० रुपये पगार मिळणार आहे.
या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती १ वर्षासाठी होणार आहे. यानंतर हा कालावधी वाढवला जाऊ शकतात. नोकरीसाठी वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे निवड केली जाणार आहे. इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो, जन्म प्रमाणपत्र, इंटर्नशिप प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, वोटर आयडी, आधार कार्ड हे कागदपत्र घेऊन जायचे आहे.
Discussion about this post