नाशिक । नाशिकमधून एक ह्रदयद्रावक घटना समोर आलीय. ज्यात कृत्रिम तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. कालपासून तिन्ही अल्पवयीन मुले बेपत्ता होती. या घटनेची माहितीची मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने तिघांचा मृतदेह तलावातून बाहेर काढले. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तिघा मुलांच्या मृत्यूनंतर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दुपारपासून तिन्ही मुलं बेपत्ता होती. त्यानंतर मृत मुलांच्या कुटुंबाने तिघांचा शोध घेण्यास सुरूवात केली. बिडी कामगार परिसारातील कृत्रिम तलावाच्या काठाजवनळ मुलांचे कपडे आढळले. त्यानंतर मुले पोहण्यासाठी गेली असावी अंदाज बांधण्यात आला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी धाव घेत शोध मोहिमेला सुरूवात केली.
अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले. त्यानंतर त्यांनी मृतदेह बाहेर काढले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर कुटुंबाने हंबरडा फोडला. या घटनेची माहिती आडगाव पोलिसांना देण्यात आली असून, त्यांनी या घटनेचा अधिक तपासाला सुरूवात केली. या घटनेची माहिती परिसरात पसरताच शोककळा पसरली आहे.
Discussion about this post