मुंबई । लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये आजपासून खात्यात जमा होणार याबाबत स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घोषणा केली आहे. जूनच्या हप्त्यासाठी निधीही मंजूर झाला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्यासाठी ३६०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, हे पैसे महिलांच्या खात्यात आजपासून जमा केले जाणार असल्याचेही अजित पवारांनी सांगितले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची जूनच्या हप्त्याची प्रतिक्षा आता संपली आहे.
लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या जूनच्या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आजपासून हे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना खूप आनंद झाला आहे.
महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अजित पवारांनी काल पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली आहे.
Discussion about this post