मुंबई : टोमॅटोच्या दराबाबत देशात सर्वत्र चर्चा सुरू असून, टोमॅटोच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघाने टोमॅटोच्या किमती कमी केल्या आहेत.
आता ९० रुपये किलो ऐवजी टोमॅटो ८० रुपये किलो दराने विकला जाणार आहे. देशातील काही शहरांमध्ये काही चांगल्या दर्जाच्या टोमॅटोची किंमतही २२० रुपये किलोपर्यंत गेली आहे. इतर शहरांमध्ये टोमॅटोचा भाव आजही १८० रुपये किलोपेक्षा जास्त आहे. टोमॅटोचे काही प्रकार तर त्याहूनही महागात विकले जात आहेत.
कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी केल्यानंतर NCCF थेट ग्राहकांना 90 प्रति किलो दराने टोमॅटो विकत होते आणि आता त्याची किंमत ८० रुपये प्रति किलो केली आहे. सरकार देशभरात जवळपास ५०० ठिकाणी थेट टोमॅटोची विक्री करत आहे.
मुंबईत टोमॅटोचे भाव १६० रुपये पार्टी किलो आहेत. तर दिल्लीत २४ जून रोजी टोमॅटोचे भाव २०-३० रुपये किलोवरून वाढून थेट १८० रुपये किलो झाले.
Discussion about this post