मुंबई । ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचं वयाच्या ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. प्रकृती अचानक खालावल्यामुळे पती पराग यांनी तिला तात्काळ अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयात दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टी आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
शेफाली जरीवालाने आपला अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. शेफाली जरीवाला यांनी २००२ मध्ये ‘कांटा लगा’ या रीमिक्स गाण्याने रातोरात प्रसिद्धी मिळवली. वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी त्यांनी या गाण्यातील नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
गुजरातमधील अहमदाबाद येथे १५ डिसेंबर १९८२ रोजी जन्मलेल्या शेफालीने ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्या ‘बिग बॉस १३’ आणि ‘नच बलिए’ सारख्या रिअॅलिटी शोमधूनही लोकप्रिय झाल्या. त्यांच्या नृत्य आणि सौंदर्याने चाहत्यांवर मोहिनी घातली होती. त्यांच्या निधनाने चाहते आणि इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.
Discussion about this post