मुंबई । गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होताना दिसून आली. यामुळे सोन्यासह चांदीचे दर गगनाला भिडले. या दरवाढीमागील कारण म्हणजे इराण व इस्रायल यांच्यातील युद्ध. मात्र या युद्धबंदीच्या घोषणेनंतर सोने चांदी दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर आजचा दिस उत्तम आहे.
आजचे सोन्याचे दर
आज २४ कॅरेट सोन्याचे दर ९८,९५० रुपये प्रति तोळा आहे. आज या दरात २७० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याची किंमत २१६ रुपये आहे. सोन्याचे दर ७९,१६० रुपये आहेत.
२२ कॅरेट सोन्याचे दर
२२ कॅरेट सोन्याचे दर ९०,७०० रुपये प्रति तोळा आहे. या दरात २५० रुपयांनी घसरण झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७२,५६० रुपये आहे. या दरात २०० रुपयांनी घसरण झाली आहे.
१८ कॅरेट सोन्याचे दर
आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात २१० रुपयांनी घसरण झाली आहे. हे दर ७४,२१० रुपये आहेत. तर ८ ग्रॅम सोन्याचे भाव ५९,३६८ रुपये आहेत.
मंगळवारी सोन्याच्या दरात २००० रुपयांनी घसरण
जळगाव गेल्या दहा ते बारा दिवसांपासून वधारलेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी दोन हजार रुपयांची घसरण झाली. यामुळे सोने ९७ हजार ४०० रुपयांवर आले. तसेच चांदीच्याही भावात ५०० रुपयाची घसरण होऊन ती एक लाख सात हजार रुपयांवर आली.गेल्या अनेक महिन्यांपासून विविध देशातील तणाव, युद्ध यामुळे सोने-चांदीचे भाव वाढत आहे. त्यात इराण व इस्रायल यांच्यातील युद्ध अधिक तीव्र होत गेल्याने सोने भाव चांगलेच वधारले.
१४ जून रोजी तर सोने एक लाख रुपयांवर गेले होते. त्यानंतर थोडेफार कमी होऊन ते ९९ हजार रुपयांच्या पुढेच होते. मात्र, सोमवारी ९९ हजार ४०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात मंगळवारी दोन हजार रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे सोने ९७ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर आले. गेल्या बारा दिवसातील सोन्याचे हे निचांकी भाव आहे. दुसरीकडे चांदीच्याही भावात ५०० रुपयांची घसरण झाली व ती एक लाख सात हजार रुपयांवर आली.
Discussion about this post